पुंडलिक दळवींनी जोपासली सामाजिक बांधिलकी ; स्वच्छतादूतांना केले शिधा वाटप.!

131

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांचा आज वाढदिवस साजरा होत आहे. आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा व्हावा, अशी पुंडलिक दळवी यांची इच्छा आहे. सामाजिक बांधिलकी जोपासत पुंडलिक दळवींनी सकाळी सावंतवाडी नगरपालिकेत जाऊन नगरपालिकेत कार्यरत असणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना आपली कन्या श्रीया दळवीच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. या कार्यक्रमास सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, तालुका सरचिटणीस हिदायतुल्ला खान, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, तालुका उपाध्यक्ष बावतीस फर्नांडिस, शहरचिटणीस राकेश नेवगी, तौसिफ आगा, फैज शेख आदी उपस्थित होते.