मळेवाडमध्ये चक्क कर्नाटक पोलीस ; काय आहे प्रकरण ..?

951

सावंतवाडी :  मळेवाड येथे एक परप्रांतीय कामगार मळेवाड येथील एका भाड्याच्या घरात काही महिन्यांपासून राहत होता.सदरच्या कामगाराचा शोध घेण्यासाठी कर्नाटक पोलिस कामगारांच्या मोबाईल लोकेशननुसार आज मळेवाडमध्ये दाखल झाले. यावेळी सदरचा कामगार ज्या घरात भाड्याने राहत होता त्या घर मालकाकडे पोलिसांनी चौकशी केली. यावेळी त्या घरमालकाने सदरचा कामगार हा नागपंचमी असल्याने गावी आपण जात असल्याचे आपणाला सांगून तो काल रात्री निघून गेला अशी माहिती पोलिसांना दिली. यावेळी पोलिसांना विचारणा केली असता त्याने एका अल्पवयीन मुलीला पळवून आणले असल्याने त्याचा शोध घेण्यासाठी आम्ही आलो असल्याचे पोलिसांनी घरमालकाला माहिती दिली. उशिरापर्यंत पोलीस मळेवाड गावात त्या कामगाराचा शोध घेत होते. तसेच त्या कामगाराला त्याच्या ज्या सहकाऱ्याने  मळेवाडीत आणले त्याचाही शोध पोलीस घेत असून हे दोघेही बेपत्ता आहेत.