सावंतवाडी : ‘मेरी माटी मेरा देश’ या संकल्पनेतून मालवण येथील गवंडीवाडी येथील राहणारे अतुल कीर्ती कुमार पराडकर यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये कार्यरत असलेले रुग्णांसाठी अहोरात्र मेहनत करून सेवा देणारे परिचारिका आरोग्य कर्मचारी डॉक्टर यांना चहा पिण्यासाठी मातीचे कुल्हड यांच्याकडून देण्याची संकल्पना जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांना बोलून दाखवली होती व त्यांनी 15 ऑगस्ट अमृत महोत्सवादिवशी त्यांनी रुग्णालयाला मातीचे कुल्हड 5 डझन भेट म्हणून देण्यात आली,

तसेच मालवण उपजिल्हा रुग्णालयाला सुद्धा अशा प्रकारची भेटवस्तू देण्यात आली यावेळी परिचारिका डॉक्टर व आरोग्य कर्मचारी व जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी अतुल कीर्ती कुमार पराडकर यांचे आभार मानून कौतुक करण्यात आली. तसेच तुळशीच्या पानावरती विठ्ठलाची छायाचित्र मालवण येथील बराडनाका येथील पार्थ मेस्त्री यांनी साकारली व गिनीज बुक ऑफ इंडिया यामध्ये त्यांनी आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे. याची देखील कौतुक जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी केले आहे





