पिंपरी : पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, नूतन ग्रुपच्या पीसीसीओई, पीसीसीओईआर व तळेगांव येथील नूतन अभियांत्रिकी महाविद्यालयातील (एनएमआयईटी व एनसीईआर) अंतिम वर्षांत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांकरिता वेरिटास टेक्नॉलॉजिस या नामांकित कंपनीच्या कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये अंतिम वर्षात शिकत असणाऱ्या म्हणजेच २०२४ बॅचच्या ३ विद्यार्थ्यांची असोसिएट सॉफ्टवेअर इंजिनिअर या पदी निवड झाली असून त्यांना १५.७८ लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज देण्यात आले. त्याचबरोबर या ३ विद्यार्थ्यांना अंतिम वर्षात शिकत असताना शेवटच्या सेमिस्टर दरम्यान इंटर्नशिपची संधी देखील देण्यात आली असून या इंटर्नशिपच्या कालावधी मध्ये ३२,००० रुपयांचे मासिक स्टायपेंड देण्यात येणार आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या केतन सरोदे, संदेश मुंढे आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या द्रोण रहांगदळे यांचा समावेश आहे.

निवड प्रक्रिया चार स्तरांमध्ये पार पडली. पहिला राउंड म्हणजे ऑनलाईन टेस्ट ज्यामध्ये कॉम्प्युटर फंडामेंटल व कोडिंग स्किल्स इत्यादींचा समावेश होता. दुसरा राउंड हा टेक्निकल इंटरव्हयू, तिसरा राउंड हा मॅनेजेरिअल इंटरव्हयू आणि अंतिम राउंड हा एच आर इंटरव्हयू चा होता.
वेरिटास टेक्नॉलॉजिस ही अमेरिकन आंतरराष्ट्रीय कंपनी असून कॅलिफोर्निया येथे तीचे मुख्यालय आहे. वेरिटास टेक्नॉलॉजिस ही एंटरप्राईज डेटा मॅनेजमेंट या क्षेत्रातील अग्रणी सॉफ्टवेअर कंपनी आहे. जगभरातील ५८ देशांमध्ये कंपनीची कार्यालय असून ७,००० पेक्षा अधिक कर्मचारी या कंपनीत कार्यरत आहेत.

मंदीच्या काळात देखील पीसीईटी – नूतन ग्रुपच्या विद्यार्थ्यांना चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत अशी माहिती पीसीईटी सेंट्रल प्लेसमेंट सेलचे अधिष्ठाता डॉ. शीतलकुमार रवंदळे यांनी दिली.
यावेळी व्हेरिटास कंपनीचे मनुष्यबळ अधिकारी श्री निरंजन काळे व इतर प्रतिनिधी उपस्थित होते.
या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये निवड झालेल्या विध्यार्थ्यांचे पीसीईटीचे अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव श्री. विठ्ठल काळभोर, खजिनदार श्री. शांताराम गराडे, विश्वस्थ व पिंपरी-चिंचवड विद्यापीठाचे कुलपती श्री. हर्षवर्धन पाटील, उद्योजक श्री. नरेंद्र लांडगे, श्री. अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्राचार्य डॉ. गोविंद कुलकर्णी, डॉ. हरीश तिवारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कॅम्पस इंटरव्ह्यूच्या यशस्वी आयोजनाकरिता प्रा. ऋषिकेश पांडे, प्रा. संदीप पिल्लेवार, प्रा. दिपक पवार, प्रा. विजय टोपे, प्रा. अनिकेत परदेशी, प्रा. हीना शर्मा, प्रा. ऐश्वर्या पाटील, मंगेश काळभोर, सर्व विभागातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचे शिक्षक प्रतिनिधी आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांनी योगदान दिले.





