संदीप गावडे मित्रमंडळ पुरस्कृत सावंतवाडी मान्सून चषक फुटबॉल स्पर्धेला सुरुवात!

120

 

 

 

सावंतवाडी : भाजपचे युवा नेते संदीप गावडे मित्रमंडळ पुरस्कृत सावंतवाडी मान्सून चषक २०२३ फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ह्या स्पर्धेचे उदघाटन आज सकाळी जिमखाना मैदान सावंतवाडी येथे माजी आमदार राजन तेली, भाजप युवा उपाध्यक्ष लखम राजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थित झाले. ही स्पर्धा महाराष्ट्र आणि गोवा मर्यादित असून अनेक संघ ह्या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. संदीप गावडे यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकारली आहे. ह्या कार्यक्रमाला भाजप माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली, भाजप युवा उपाध्यक्ष लखम राजे भोसले, माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी पं. स. सदस्य संदीप गावडे,जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी,जिल्हा बँक संचालक रविंद्र मडगांवकर, सावंतवाडी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांसह भाजपचे पदाधिकारी, संदीप गावडे मित्रमंडळचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.