मळेवाड येथे स्वच्छता कामगार गजानन नाईक यांच्याहस्ते ध्वजारोहण ; मळेवाड कोंडूरे ग्रामपंचायतने घातला नवा आदर्श.

445

सावंतवाडी : ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे कार्यालयाचे ध्वजारोहण स्वच्छता कामगार गजानन नाईक यांच्या हस्ते करुन ग्रामपंचायतने नवा आदर्श घातला आहे. आज देशभरात 15 ऑगस्ट निमित्त ध्वजारोहण मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला.सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेच्या कार्यालयाचे ध्वजारोहण ग्रामपंचायत कंत्राटी स्वच्छता कामगार गजानन नाईक यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी उपसरपंच हेमंत मराठे यांनी या ध्वजारोहणासंदर्भात माहिती देत असताना गजानन नाही हे ग्रामपंचायतचे स्वच्छता कामगार नसून ते गावाचे स्वच्छता दूत आहेत, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही असे सांगत या स्वच्छता दूतालाही सन्मान मिळावा या उद्देशाने आजच्या दिवसाचे ध्वजारोहण गजानन नाईक यांच्या हस्ते करण्यात आले असल्याचे मराठे यांनी सांगितले.

एका सफाई कामगाराला ध्वजारोहणाचा मान देऊन ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेने इतरासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.गजानन नाईक व त्यांची पत्नी गजश्री नाईक यांचा ध्वजारोहणानंतर ग्रामपंचायत कडून भेटवस्तू,शाल,श्रीफळ व सुपारीचे रोप देऊन सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमा वेळी सरपंच सौ मिलन पार्सेकर,ग्रामपंचायत सदस्य अमोल नाईक,कविता शेगडे,स्नेहल मुळीक,खुशी कुंभार,सानिका शेवडे,मधुकर जाधव,अर्जुन मुळीक,महेश शिरसाठ,गिरजा मुळीक,पोलीस पाटील दिगंबर मसुरकर,माजी सरपंच लाडोबा केरकर,तलाठी अनुजा भास्कर,कृषी सहायक गवंडे,आरोग्य सेवक बाबली गवंडे,सतीश सातार्डेकर,गुरुप्रसाद नाईक,सगुण नाईक,बापू मुळीक, दिलीप शिरसाट,प्रवीण नाईक आदी ग्रामस्थ उपस्थित होते.गजानन नाईक यांनी आपले मत मांडताना आपल्या सारख्या व्यक्तीलाही ग्रामपंचायतने ध्वजारोहणाचा मान दिल्याबद्दल गजानन नाईक यांनी ग्रामपंचायतीचे आभार मानले.ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेकडून यापूर्वी देखील गावातील अपंग व्यक्ती,विधवा महिला,प्रगतशील महिला,माजी सैनिक अशा विविध व्यक्तींच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले होते.