शेर्ले येथे ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियानांतर्गत विविध उपक्रम संपन्न.

60

सावंतवाडी : ग्रामपंचायत शेर्ले येथे ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम आयोजित करणेत आले.  यावेळी शिला फलकाचे अनावरण शहिद अंकुश सखाराम तारी यांच्या वीरपत्नी श्रीमती. तारी यांच्या हस्ते करणेत आले.

याबरोबर ध्वजारोहण, पंचप्राण शपथ, वृक्षारोपण, शहिद विरांना श्रद्धांजली, गावातील माजी सैनिक, निवृत्त पोलीस यांचा सत्कार सन्मान सोहळा करणेत आला. तर मूळ माती कलशात भरणे, हर घर तिरंगा झेंडा फडकविणे याबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन करणेत आले. यावेळी सरपंच श्रीम. प्रांजल प्रशांत जाधव, उपसरपंच दीपक झिलू नाईक, ग्रामसेवक राजन रामा नाईक, आजी व माजी ग्रा.पं.सदस्य, माजी सैनिक, माजी सरपंच, पोलीस पाटील, शासकीय कर्मचारी, लोकप्रतिनिधी, ग्रा.पं. कर्मचारी, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.