बांदा : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विठ्ठल मंदिर बांदा व सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी शिबिरात एकूण ६६ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या शिबिराला बांदा सरपंच प्रियांका नाईक,उपसरपंच जावेद खतीब,माजी जि प सद्स्य स्वेता कोरगावकर, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विठ्ठल मंदिर बांदाचे अध्यक्ष अजय स्वार, दयानंद गवस,ज्ञानेश्वर भुजबळ, ऋषिकेश गच्चे,मंदार कल्याणकर, आबा धारगळकर,दादा पावसकर, विठ्ठल वाळके,अक्षय मयेकर, सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानचे सावंतवाडी कार्यकारिणी सल्लागार सुधीर पराडकर,संजय पिळणकर,बाबली गवंडे,सिद्धार्थ पराडकर,मीनल सावंत आदी उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी माजी जि. प. सदस्या श्वेता कोरगावकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिनी रक्तदान केले. तसेच त्यांचा आदर्श जोपासत इतर महिलांनी देखील उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. यापूर्वी त्यांनी रक्तदान करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली शिरसाठ यांनी केले.





