‘बाहुबली’ नावावरून वाद चिघळणार? ; आंबोली घाटातील ‘या’ धबधब्याला ग्रामस्थांचा विरोध, सरपंचांनी फाडला ‘बॅनर’

74

सावंतवाडी : राज्याच्या पर्यटन विभागाने आंबोली घाटातील मुख्य धबधब्याजवळच्या एका धबधब्याला ”बाहुबली” हे नाव दिल्यावरून वाद निर्माण झाला आहे. आंबोली ग्रामस्थांनी या फिल्मी नावाला विरोध केला, तर पारपोली ग्रामस्थांनी या धबधब्याच्या नूतनीकरण कामाचे उद्‌घाटन मंत्र्यांची वाट न पाहता केले.

आंबोली घाटातील धबधब्याला दिलेल्या ‘बाहुबली’ या नावाबाबत येथील ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. धबधब्यांना चित्रपटातील नावे देऊ नयेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून, याबाबत शालेय मंत्री दीपक केसरकर यांचेही लक्ष वेधणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.