सावंतवाडी : सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय येथे क्रांतिदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
इयत्ता अकरावीच्या विद्यार्थिनींनी ‘उठा राष्ट्रवीर हो..!’ तसेच बारावीच्या विद्यार्थिनींनी ‘देश माझा मी देशाचा..!’ ही देशभक्तीपर समूहगीते सादर केली. तसेच क्रांतिदिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. प्रा. सोनाली परब यांनी क्रांतिदिनाचे महत्त्व व पार्श्वभूमी विद्यार्थ्यांसमोर मांडली. सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. प्रसाद कोलगावकर यांनी केले. कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रा. उत्तम पाटील यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. श्रीम. नाईक यांनी आभार मानले.





