बांदा : कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले गावात प. पू. स्वामी गिरीशनाथ आंबिये यांचा १४ वा पुण्यस्मरण सोहळा शुक्रवार दिनांक २० जानेवारी २०२३ ते रविवार दि. २२ जानेवारी २०२३ पर्यंत समाधी मंदिर आंदुर्ले येथे साजरा होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रम पत्रिका पुढील प्रमाणे आहे :
पुण्यतिथी सोहळा शुक्रवार पौष कृ. १४ शके १९४४ दि. २० जानेवारी सकाळी ८.०० वा.श्री पादुकावर लघुरूद्राभिषेक ,दुपारी १२.०० वा.यतिआराधना व ब्राह्मण संभावना, दुपारी १.०० – ३.०० वा. आरती व महाप्रसाद, संध्या. ७.०० वा.दिपोत्सव, भजन, पालखी पदक्षिणा, रात्री ९.०० वा. ह. भ. प. सदाशिव पाटील यांचे सुश्राव्य किर्तन.
शनिवार दि. २१ रोजी सकाळी ७.३० वा.श्रींची अभिषेक सेवा, सकाळी ८.३० वा.श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२.३० वा, संध्या. ७.०० वा.आरती व महाप्रसाद भजन, पालखी प्रदक्षिणा रात्रौ ९.०० वा, ह. भ. प. श्री मकरंद देसाई यांचे सुश्राव्य किर्तन.
रविवार माघ शु. प्रतिपदा शके १९४४ दि. २२ जानेवारी २०२३ सकाळी ८.०० वा.दुपारी १२.३० वा, लघुरूद्राभिषेक व समाधीपूजा आरती व महाप्रसाद, दुपारी ३.०० वा. हळदीकुंकु समारंभ,संध्या. ७.०० वा. भजन, पालखी प्रदक्षिणा रात्रौ ९.०० वा, ह. भ. प. श्री मकरंद देसाई यांचे सुश्राव्य किर्तन आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन कऱण्यात आले असून भाविकांनी या सोहऴ्याचा लाभ घेण्याचे आवाहन प. पू. स. समर्थ श्री स्वामी गिरीशनाथ आंबिये सेवा ट्रस्ट, आंदुर्ले, कुडाळ यांच्यावतीने करण्यात आले आहे.




