बांदा : शालेय जीवनातील विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कौशल्यातूनच विद्यार्थी घडत असतात. शालेय स्तरावर छोट्या छोट्या कौशल्यातुनच विद्यार्थी यशस्वी होत आहे असे मत ग्रा.पं सदस्य तथा उद्योजक रत्नाकर आगलावे यांनी व्ही.एन.नाबर.इग्लिश मिडीअम स्कूल बांदा मधील जागतिक युवा कौशल्य दिनाच्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बांदा गावचे सरपंच श्रीमती प्रियांका नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. श्वेता कोरगावकर सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक भाऊ वळंजू, उद्योजक शशी पित्रे प्रशाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मनाली देसाई शाळेचा माजी विद्यार्थी साहिल बांदेकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने व सरस्वती प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. व्यासपीठावरील मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
उद्योजक रत्नाकर आगलावे बोलताना पुढे म्हणाले विद्यार्थ्यांनी आपली ध्येय निश्चिती आत्ताच निश्चित केली पाहिजे तरच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचणं भविष्यात सोपं होईल सोपं होईल. शिक्षणाबरोबरच कौशल्य शिक्षण घेणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी बोलताना व्यक्त केले.
पुढील तंत्रज्ञान शिक्षणाकडे वळताना विद्यार्थ्यांना एम.एस. एफ.सी. विषयासारख्या कौशल्य शिक्षणाची आता खरी गरज आहे म्हणूनच आपल्या प्रशाळेत संस्थेने हा विषय सूरू ठेऊन विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार केला आहे. शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी शिस्त पाळली पाहीजे. तरच तुम्ही आपल्या धैर्यापर्यंत पोहचू शकता असे मत अध्यक्षस्थानावरून बोलताना सरपंच श्रीमती प्रियांका नाईक यांनी व्यक्त केले.
ध्येय निश्चित करण्यामध्ये कौशल्य विकास तुम्हाला मदत करत असल्याचे मत माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.श्वेता कोरगावकर यांनी बोलताना सांगितले. यावेळी प्रशाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मनाली देसाई यांनी विद्यार्थ्यांना कौशल्य दिनानिमित्त मार्गदर्शन केले.कौशल्य दिन कार्यक्रमाचे योग्य नियोजन एम.एस.एफ.सी.विभागाने केल्याचे मत बोलताना व्यक्त केले.
इयत्ता नववी व दहावी मधील एम.एस.एफ.सी विषयामधील इंजिनिअरिंग ड्राँईंग चा खरा फायदा मला आता शिकत असलेल्या मरीन इंजिनिअरिंग शिक्षणासाठी झाला असल्याचे मत शाळेचा माजी विद्यार्थी साहील बांदेकर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेती विभागाच्या निदेशिका सौ.गायत्री देसाई, व्यासपीठावरील प्रमुख पाहुण्यांची ओळख ऊर्जा पर्यावरण विभागाचे निदेशक श्री.भुषण सावंत तर सुत्रसंचालन एम.एस.एफ.सी. विभागाचे समन्वयक श्री.राकेश परब, आभार इयत्ता नववी मधील विद्यार्थ्यांनी श्रीशा सावंत हीने मानले. यावेळी निदेशिका सौ.रिया देसाई, सहाय्यक शिक्षिका कु. सितारा मांद्रेकर, कु. स्नेहा गावडे, कु. तुप्ती परब, कु.लवीना डीसोजा उपस्थित होत्या.





