स्वातंत्र्यदिनी देवगड येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन ; रोटरी क्लबचा पुढाकार.

110

देवगड : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी सांगता वर्षानिमित्त रोटरी क्लब ऑफ मँगोसिटी, देवगड तर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा ही 15 ऑगस्ट रोजी शेठ म. ग. हायस्कूल येथे सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत घेण्यात येईल.
यासाठी आपल्या शाळेच्या जास्तीत जास्त स्पर्धकांनी
यात आपला सहभाग नोंदवावा.
स्पर्धकांनी लागणारे रंग साहित्य व इतर गोष्टी स्वतः च्या स्वतः आणायच्या आहेत. चित्रासाठी लागणारे कागद पुरविले जातील. स्पर्धा ही चार गटामध्ये घेण्यात येईल.

पहिला गट (पहिली ते चौथी) (विषय :भारतीय ध्वज )

यासाठी विजेत्यांना वस्तूरूपी आकर्षक बक्षिसे

दुसरा गट (5 वी ते 7 वी) (विषय :पारंपरिक सण /उत्सव )
बक्षीसे रोख रु. प्रथम 700/-, द्वितीय 500/-, तृतीय 300/-

तिसरा गट (8 वी ते 10 वी) ( विषय : पूर परिस्थिती व मदतकार्य )
बक्षीसे रोख रु प्रथम 1000/-, द्वितीय 700/-, तृतीय 500/-

चौथा गट (खुलागट)( विषय :स्वातंत्र्य संग्रामातील एखादं दृश्य )

बक्षीसे रोख रु. प्रथम 1500/-, द्वितीय 1000/-, तृतीय 700/-
प्रत्येक गटासाठी दोन आकर्षक उत्तेजनार्थ बक्षीसे देण्यात येतील.

स्पर्धेचे नियम व अटी स्पर्धेच्या ठिकाणी सांगण्यात येतील. त्यामुळे स्पर्धकांनी वेळेच्या आधी उपस्थित रहाणे गरजेचे आहे.. सर्व स्पर्धकांनी आपली नावे 14 ऑगस्ट पर्यंत आयोजकांकडे द्यावीत, असे प्रेसिडेंट रो. प्रवीण पोकळे यांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी दया पाटील( 9405928080) , किंवा
अनिल कोरगावकर ( 9657 431 038 ) यांचेशी संपर्क करावा.