बांदा : कोकणातील निसर्ग जैव विविधतेने समृद्ध असून पावसाळ्याच्या सुरुवातीस अनेक रानभाज्या कोणत्याही लागवडीशिवाय,रासायनिक खतांशिवाय व किटकनाशकांशिवाय उगवलेल्या व वाढलेल्या अशा रानभाज्या आरोग्यवर्धक व सुरक्षित आहेत. परिसरात अगदी मुबलक व फुकट मिळणाऱ्या रानभाज्या शिजवून ग्रामिण भागातील लोक उदरनिर्वाह चालवितात. या सर्व रानभाज्या औषधी गुणांनी युक्त असल्याने त्यांचा आहारात उपयोग करा व निरोगी रहा असे सल्ला कृषी सहाय्यक रसिका वसकर यांनी केले.
जिल्हा परिषद विलवडे नं.२ (टेंबवाडी) रानभाज्या प्रदर्शन मार्गदर्शनपर कार्यक्रम उत्साहात झाला. यावेळी ओसकर बोलत होते. पालकांनी आपल्या मुलांना आपल्या परिसरामध्ये उपलब्ध होणार्या रानभाज्यांचे प्रदर्शनास टाकळा,कुरडू,बांबूचे कोंब,कुड्याच्या शेंगा तेरा,अळु आदी विविध रानभाज्या उपलब्धता करुन दिल्याने रानभाज्या प्रदर्शन यशस्वी झाला.
यावेळी सरपंच प्रकाश दळवी, कृषी सहाय्यक रसिका वसकर, माजी उपसभापती कृष्णा सावंत, अध्यक्ष रश्मी सावंत,ग्रामपंचायत सदस्या अपर्णा दळवी,माजी विलवडे मनसे शाखाध्यक्ष श्रीराम सावंत, प्राजक्ता दळवी,पूर्वा दळवी, महेंद्रसावंत,आशा सेविका परब, मोनिका नाईक, प्रमोदिनी देसाई, समिता सावंत,सायली दळवी, महेंद्र सावंत,मनाली दळवी, समिधा सावंत ,मानसी सावंत,जान्हवी दळवी,वेदिका दळवी,सुमिक्षा सावंत पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची प्रशंसा केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मुख्याध्यापक सुरेश काळे तर स्वागत व आभार सहशिक्षिका प्रमिला ठाकर यांनी मानले.





