सावंतवाडी : तालुक्यातील कलंबिस्त गणशेळवाडी येथील श्री. भास्कर भोजू सावंत (वय- ५५) वर्ष यांनी आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. घरात ते एकटेच होते. मानसिक दबावाखाली असल्याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज सावंतवाडी पोलिसांनी व्यक्त केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत. बी. एस्सी पर्यंत त्यांचे शिक्षण झाले होते. त्यांचे व्यक्तिमत्व अत्यंत अभ्यासू होते.





