सावंतवाडी: स्व. वाळके मास्तर जयंती निमित्त स्वराज्य संघटना व आजी-माजी विद्यार्थ्यांकडून शहरात आजा विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. वाळके मास्तर व्यायाम शाळेमध्ये स्वराज्य संघटना व आजी-माजी विद्यार्थ्यांकडून कै.वाळके मास्तर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पित करण्यात आला. तसेच उपजिल्हा रुग्णालयाच्या अपघात विभागाला शुद्ध पाण्याची सोय व्हावी म्हणून ॲक्वागार्ड माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांच्या हस्ते देण्यात आला. त्यानंतर स्वराज्य संघटना व आजी-माजी विद्यार्थ्यांकडून ॲड. बापु गव्हाणकर यांच्या हस्ते सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये ६० खुर्च्या भेट स्वरुपात देण्यात आल्या. या खुर्च्यांचा लाभ पेशंट व स्टाफसाठी व्हावा या उद्देशांन देण्यात आल्या आहेत. अशा विविध सेवाभावी उपक्रमातून कै. वाळके मास्तर यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी आरोग्य सभापती सुधीर आरीवडेकर, ॲड.बापू गव्हाणकर, दिनेश गावडे, मंगेश घोगळे, अमोल साटेलकर, किशोर सोन्सुरकर, एल. ए. निचम, बाबू इन्सुलकर, अ ॲड.राजू कासकर, राजू मसुरकर, राजू भालेकर, विशाल पोटनीस, मनोज हवालदार, अंकित सोंसुरकर आदी कै. वाळके मास्तर व्यायाम शाळेचे सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष अमोल साटेलकर यांनी केले तसेच स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते त्यांनी देखील या उपक्रमाला हातभार लावला त्यांच्या या उपक्रमाचे शहरात कौतुक होत आहे.





