नवी दिल्ली : केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचं आज राज्यसभेत रौद्ररूप पाहायला मिळालं. राणे यांनी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्यावर जोरदार हल्लाबोल करताना पार औकात शब्दांचा उल्लेख केला.
नारायण राणे म्हणाले की, अरविंद सावंत यांनी केलेलं भाषण ऐकून मला वाटलं मी महाराष्ट्र विधान सभेत बसलो आहे. अरविंद सावंत यांनी श्रीकांत शिंदे यांना उत्तर दिलं होत. हे पळपुटे आम्हाला हिंदुत्व शिकवणार का? असा खोचक सवाल सावंत यांनी केला होता.
मंदिरात घंटा बडवणारं हिंदुत्व नको तर अतिरेक्यांविरोधात बंदूक हाती घेणारं हिंदुत्व बाळासाहेबांनी आम्हाला शिकवल्याचं सावंत म्हणाले होते. यावेळी भाषणादरम्यान शिंदे-ठाकरे गटात सभागृहात जुंपल्याचं चित्र होतं.दरम्यान शरद पवार यांच्यासोबत गेले तेंव्हा हिंदुत्व नाही आठवलं का? पक्ष वाढवायला पण ताकद लागते. मी पक्ष सोडल्यानंतर 200 लोकांनी प्रोटेक्शन दिल होतं. त्यामुळे यांची पंतप्रधानांवर बोलण्याची औकात नाही. तसेच तुम्ही मोदी, शाह यांच्यावर बोलले तर मी तुमची औकात काढेलच, असंही राणे म्हणाले.





