सावंतवाडी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी बांदा येथील मिलिंद सावंत यांची निवड करण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्ष बांधलेला सुरुवात केली आहे. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार तालुका अध्यक्ष यांच्या नियुक्ती करण्यात आली आहेत.
बांदा शहरातील सामाजिक कार्यकर्ते मिलिंद सावंत यांची मनसे सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे तसे पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना दिले आहे मिलिंद यांनी सन 2006 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला सुरुवातीला बांधा उपशहर अध्यक्षपद त्यानंतर बांधव विभाग अध्यक्ष म्हणून काम पाहिले सन 2010 मध्ये पक्षप्रमुख राज ठाकरे यांना अटक झाली त्यावेळी सावंतवाडी येथे मिलिंद यांनी पुढाकार घेत आंदोलन छेडले होते. त्यांना देखील अटक करण्यात आली होती.
डिंगणे डोंगरपाल डेगवे इन्सुली, निगुडे, पडवे, माजगाव विलवडे, भालावल या गावांमध्ये मनसे शाखेची स्थापना करण्यात त्यांची मोलाची भूमिका होती. तसेच दशक्रोशीतील लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या मार्गी लावण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केला याची पक्षाने दखल घेत सावंतवाडी तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी मिलिंद सावंत यांच्या कांद्यावर सोपवली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.





