नवी दिल्ली : महाराष्ट्रातील एनडीए खासदारांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक बोलावली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पंतप्रधान क्लस्टर बैठका घेत आहेत. आज महाराष्ट्र आणि गोव्यातील 48 खासदारांची एकत्रित बैठक आहे. सायंकाळी 6 वाजता नवीन महाराष्ट्र सदनात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मंत्री नितीन गडकरी, मंत्री राजनाथ सिंह बैठकीला उपस्थित राहणार आहे. भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात मिशन 45 चा नारा दिला आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी कंबर कसली आहे. आगामी निवडणुकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस देखील भाजपसोबत असेल.
२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी नरेंद्र मोदी या क्लस्टर बैठका घेत आहेत. भाजप प्रत्येक राज्यासाठी वेगळे नियोजन करत आहे. आज नरेंद्र मोदी काय रणनिती ठरवणार, हे पाहणे महत्वाचे ठरेल. आजच्या बैठकीत अजित पवार गटाचे खासदार देखील सहभागी होणार आहे.
मोदी एनडीएच्या लोकसभा आणि राज्यसभेच्या सर्व 430 खासदारांना भेटणार आहेत. नरेंद्र मोदी विविध गटातील सर्व खासदारांना भेटणार आहेत. यामध्ये ते नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशच्या खासदारांची भेट घेत आहेत.
नरेंद्र मोदी पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिशाच्या खासदारांनाही भेटणार आहेत. यामध्ये गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे देखील सहभागी होणार आहेत.





