सावंतवाडी : शालेय वर्ष २०२२ -२३ मध्ये घेण्यात आलेल्या गणित व विज्ञान अॉलिम्पियाड परीक्षेत मिलाग्रीस प्रशालेच्या कु. आदित्य पारधी (इयत्ता ६वी ड ) व कु. मानस जानकर (इयत्ता ७ वी ड ) यांनी कांस्यपदक व प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांचा प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल, पर्यवेक्षिका सौ.मेघना राऊळ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Home ब्रेकिंग न्यूज मिलाग्रीस प्रशालेच्या विद्यार्थ्यांची भरारी! ; गणित, विज्ञान अॉलिम्पियाड परीक्षेत सुयश..!





