अद्वैत मीडियाच्या वतीने राज्यस्तरीय कथा, काव्य स्पर्धेचे आयोजन..!

68

कणकवली : अद्वैत मीडियाच्या वतीने राज्यस्तरीय कथा आणि काव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली असून २५ ऑगस्ट पर्यंत साहित्य पाठवण्याचे आवाहन अद्वैत मीडियाच्या वतीने करण्यात आले आहे.कथा स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक पुरस्कार रु २५०० , द्वितीय पुरस्कार रु.२०० तृतीय पुरस्कार रु १००० आणि काव्य स्पर्धेसाठी प्रथम पुरस्कार रु २०००, द्वितीय रु १५०० ,तृतीय रु १००० देऊन विजेत्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. विजेत्या स्पर्धकांच्या कथा आणि कवितांसह परीक्षकांनी निवडलेल्या दोन उत्कृष्ट कथा आणि पाच कविता अद्वैत दिवाळी अंकात प्रसिद्ध केल्या जातील. कथा ,कविता ही स्वलिखित असावी, पूर्वप्रसिद्ध झालेली नसावी. स्पर्धेत सहभाग मोफत असून कथेसाठी शब्दमर्यादा २००० ते २५०० शब्द असून कवितेसाठी शब्दमर्यादा नाही. आपले साहित्य खालील इमेल अथवा व्हाटसअप नं वर टाईप करून पाठवावे. rujuta664gmail.com, व्हाटसअप नं ९६०४६५५८४४ / ७०८३८३४३५६. अधिक माहितीसाठी मोबा. नं. ९४०३२९६६९४ / ९४०४४५००५६ वर संपर्क साधावा.