जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कारांसाठी आवाहन ; नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचा पुढाकार..!

165

सावंतवाडीः नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेमार्फत शिक्षक दिनानिमित्त जिल्ह्यातील
दोन उपक्रमशील शिक्षकांना उपक्रमशील शिक्षक पुरस्कार प्रदान करून गौरविले जाते. हे पुरस्कार पाच सप्टेंबर शिक्षकदिनी जाहीर केले जातात. येत्या शैक्षणिक वर्षातील पुरस्कारांसाठी जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांनी आपल्या माहितीचे प्रस्ताव २० ऑगस्टपर्यंत संस्थेकडे पाठवावेत, असे आवाहन नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आत्माराम राऊळ यांनी केले आहे.

यातील पहिला पुरस्कार गुरुवर्य ज. भा. पेंढारकर यांच्या स्मरणार्थ नलिनी ज. पेंढारकर यांनी पुरस्कृत केला असून, यासाठी जिल्ह्यातील उपक्रमशील पुरुष शिक्षकांनी आपल्या माहितीचे प्रस्ताव पाठवावयाचे आहेत. दुसरा पुरस्कार हा सहकार महर्षी शिवरामभाऊ जाधव यांच्या पत्नी प्रमिला जाधव ज्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मित्रपरिवाराने पुरस्कृत केला आहे. या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील केवळ शिक्षिकांनीच प्रस्ताव पाठवावयाचे आहेत. शिक्षकांनी आपल्ये प्रस्ताव दोन छायाचित्रांसह कल्पना बोवलेकर, प्राचार्या, नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नेमळे, ता. सावंतवाडी येथे पाठवायचे आहेत.