भयानक… !आंबोली पोलिसांकडून थरारक पाठलाग ; प्राण्यांचे मांस वाहतूक करणार्‍या गाडीसह चालक ताब्यात..!

1111

सावंतवाडी : आंबोली पोलिसांनी आजऱ्याहून सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या चार चाकीला आंबोली पोलीस चेक पोस्टवर तपासणी करिता थांबविण्याचा प्रयत्न केला असता सदर गाडी चालकाने गाडी न थांबवता पलायन करण्याचा प्रयत्न केला असता आंबोली पोलिसांनी थरारक पाठलाग करून सदर चार चाकी आंबोली फॉरेस्ट ऑफिस कडे पकडली.यावेळी गाडी चालकाची आणि गाडी तपासणी केली असता सदरच्या गाडीमध्ये प्राण्याचे मांस असल्याचे आढळून आले.यामुळे पोलिसांनी वनविभाग अधिकाऱ्यांना यामांसा संदर्भात माहिती देऊन संशयित आरोपी म्हणून चार चाकी चालकाला वनविभागाच्या ताब्यात दिले.सदरचे मास हे एखाद्या पाळीव प्राण्याचे किंवा जंगली प्राण्याचे आहे की नाही हे तपासासाठी पाठवण्यात आले आहे.सदरचे मांस हे विक्रीसाठी गोव्यात की अन्य कोणत्या ठिकाणी नेले जात होते का याबाबत वन अधिकारी तपास करीत आहेत.या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे..