उद्या हे कोकणी माणसाला नक्षलवादी म्हणतील ; आदित्य ठाकरेंचा भाजपवर ट्विटर वार!

49

मुंबई : नाणार असो की बारसू असो… भाजपा महाराष्ट्रद्वेषी आहे हे वारंवार दिसतंच आणि त्याबरोबरच दिसतं ते मिंधेंचं सत्तेच्या लोभापायी कोकणी माणसाला दगा देणं! अशी टीका ट्विट द्वारे आदित्य ठाकरे यांनी भाजप – सेना सरकार वर केली आहे. पुढे ते असे म्हणाले कि, पण त्याहीपुढे प्रश्न पडतो, ह्यांचा कोकणावर आणि कोकणी माणसावर एवढा राग कश्यासाठी? “पाकिस्तानशी संबंध, बंदिस्त संघटना, परदेशी फंडिंग” अश्या गोष्टी कोकणाशी जोडून हे महाराष्ट्रद्वेष्टे कोकणी माणसाला देशद्रोही का ठरवू पाहताएत? असा सवाल ठाकरेंनी विचारला.

उद्या हे कोकणी माणसाला नक्षलवादी म्हणतील, त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करतील… स्वतःचं खोटं रेटायला कोकणी माणसाचा बळी देतील! कारण एकच- ह्यांच्या महाराष्ट्र द्वेषा विरुद्ध उभ्या राहणाऱ्या कोकणी माणसावरचा राग! असा ट्विट आदित्य ठाकरेंनी केलं आहे.