पोलीस पाटील हा गावाचा डोळा! ; एपीआय शामराव काळे.

58

बांदा: गावातील पोलीस पाटील हा गावाचा डोळा आहे. गावातील प्रत्येक हालचाली व घटनांवर त्याचे लक्ष असणे आवश्यक आहे. पोलीस पाटील सतर्क असतील तर गावातील होणाऱ्या अनुचित घटना घडण्यास प्रतिबंध होईल. यासाठी पोलीस पाटलांनी नेहमी सतर्क राहून गावातील सर्व घटनांची माहिती पोलीस स्थानकात कळवावी असे आवाहन बांदा सहाय्यक  पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी येथील पोलीस स्थानकात आयोजित बैठकीत केले. बांदा पोलिस स्थानकात येथील कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावातील पोलीस पाटील यांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे बोलत होते. यावेळी उपनिरीक्षक समीर भोसले, पोलीस कॉन्स्टेबल सिद्धू माळकर तसेच या बैठकीला सावंतवाडीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी संध्या गावडे  यादेखील उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना शामराव काळे यांनी गावात राहत असलेले परप्रांतीय भाडेकरू यांची माहिती घ्या. संशयित व्यक्ति दिसल्यास तात्काळ पोलीस स्थानकात कळवा असे आवाहन केले. तसेच एखादी अनुचित घटना घडण्याची शक्यता असेल तर त्याची तात्काळ माहिती आम्हाला द्या. सध्या इतर ठिकाणी सुरू असलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटना आपल्या गावात घडू नये यासाठी गावात जनजागृती करून कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सहकार्य करा असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी मडुरा पोलीस पाटील नितिन नाईक, कास पोलीस पाटील प्रशांत पंडीत, इन्सुली पोलीस पाटील सौ. जागृती गावडे, रोणापाल पोलिस पाटील सौ. निर्जरा परब, कोनशी पोलीस पाटील सौ. नम्रता कोनशिकर, दाभील पोलीस पाटील घाडीगावकर, असनिये पोलीस पाटील कोळापटे, नेतर्डे पोलीस पाटील निळकंठ भिसे गवस, सातोसे पोलीस पाटील सातार्डेकर, शेर्ले पोलीस पाटील विश्राम जाधव, पाडलोस पोलीस पाटील सौ.माधव, निगुडे पोलीस पाटील मयेकर या बैठकीला सावंतवाडीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी संध्या गावडे उपस्थित होत्या