सावंतवाडी : येथील मोती तलावाच्या पात्रात मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून शहराच्या सौंदर्यात बाधा येत आहे. त्यामुळे तात्काळ हा कचरा काढण्यासाठी पालिका प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणी भाजपच्या युवा मोर्च्याच्या माध्यमातून आज सावंतवाडी पालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्याकडे करण्यात आली आहे. दरम्यान शहरातील अंतर्गत भागातील रस्त्यावर झाडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. याकडे तात्काळ लक्ष द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन तालुका चिटणीस बंटी पुरोहीत यांनी दिले आहे.
यावेळी परिक्षीत मांजरेकर, विनोद सावंत आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, शहरातील मोती तलावात मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. त्यामुळे सौंदर्याला बांधा येत आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाडी वाढली आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याबाबत योग्य ती भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे..





