JOBS – रेल्वेमध्ये तब्बल १,३०० पदांवर मेगाभरती ; लोको पायलट, ट्रेन मॅनेजर होण्याची सुवर्णसंधी!

125

मुंबई : सेंट्रल रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात भरतीची जाहिरात निघाली आहे. ज्युनिअर इंजिनिअर, लोको पायलट आणि ट्रेन मॅनेजर या पदांसाठी ही भरती असणार आहे. एकूण १,३०३ पदं यामार्फत भरली जाणार आहेत.

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. सेंट्रल रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवरुन (rrccr.com) तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. GDCE कोट्यातून ही भरती केली जात आहे. यासाठी 1 ऑगस्ट रोजी नोटिफिकेशन जारी करण्यात आलं होतं. तर, 3 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत.

कोणाला करता येणार अर्ज?

या पदांवर भरतीसाठी अर्ज करणारी व्यक्ती मध्य रेल्वेची नियमित कर्मचारी असणं आवश्यक आहे. तसंच, या कर्मचाऱ्याची नियुक्ती 1 ऑगस्ट 2021 पूर्वी झालेली असणं गरजेचं आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला आहे, किंवा ज्यांची बदली मध्य रेल्वेमधून दुसरीकडे झाली आहे; त्यांना याठिकाणी अर्ज करता येणार नाही.

किती पदांवर भरती?

  • असिस्टंट लोको पायलट – 732 पदं
  • टेक्निशिअन – 255 पदं
  • ज्युनिअर इंजिनिअर – 234 पदं
  • गार्ड/ट्रेन मॅनेजर – 82 पदं
  • आवश्यक शैक्षणिक पात्रता

    असिस्टंट लोको पायलट – NCVT/SCVT च्या मान्यताप्राप्त संस्थांमधून मॅट्रिक्युलेश/SSLC आणि ITI किंवा त्याऐवजी एखाद्या मान्यताप्राप्त संस्थेतून इंजिनिअरिंगचा तीन वर्षांचा डिप्लोमा आवश्यक.

    टेक्निशिअन – NCVT/SCVT च्या मान्यताप्राप्त संस्थांमधून मॅट्रिक्युलेश/SSLC आणि ITI सर्टिफिकेट आवश्यक.

    ज्युनिअर इंजिनिअर – कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ वा संस्थेतून बेसिक स्ट्रीमच्या कोणत्याही सब स्ट्रीममध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा आवश्यक.

    वयोमर्यादा

    यूआर प्रवर्गातील उमेदवारांसाठी 42 वर्षे वयोमर्यादा आहे. तर, ओबीसी प्रवर्गासाठी 45 वर्षं आणि एससी/एसटी प्रवर्गासाठी 47 वर्षं वयोमर्यादा आहे.