“दरदिवशी ७० मुली गायब होतायत, हे खरं नाहीये!” ; महिलांच्या सुरक्षेबाबत फडणवीसांनी सांगितली आकडेवारी.

75

मुंबई :  विधीमंडळ अधिवशनाच्या आज (४ ऑगस्ट) शेवटच्या दिवस असून आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था यांसंबंधीची माहिती सभागृहात दिली. गुन्ह्यांच्या बाबतीत महाराष्ट्राचा क्रमाक देशात तिसरा नसून १०वा असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केलं. तसेच महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचार आणि त्यांच्या अपहरणांसंबंधी आकडेवारी देखील विधान परिषदेत सांगितली.

यावेळी बोलताना फडणवीस यांनी आपण समज तयार करण्याचा प्रयत्न करतोय की राज्यात दररोज ७० मुली गायब होतायत, महाराष्ट्रात मुली सुरक्षित नाहीयेत, हे खरं नाहीये. आपण याचा विश्लेषण केलं, तेव्हा अनेकवेळा ज्येष्ठ महिला घरून निघून गेलेल्या असतात. काही घरची कारणं असतात, त्याची तक्रार होऊन पोलिस त्यांना घरी आणतात असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्र देशात १०व्या क्रमांकावर

फडणवीस यांनी स्पष्ट केलं की, मुंबई इतर मोठ्या शहराच्या तुलनेत महिलांना सुरक्षित वाटते. महिला रात्री-अपरात्री येथे प्रवास करतात. सांगितलं गेलं की, महाराष्ट्र गुन्हांमध्ये तीसरा आहे. पण महाराष्ट्र मोठा असून राज्याची लोकसंख्या देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. याचा विचार करता एक लाख गुन्ह्यांमध्ये महराष्ट्रात भारतीय दंड संविधानाच्या गुन्ह्याचं प्रमाण २९४.३ इतकं आहे. यानुसार महाराष्ट्राचा क्रमांक देशात १०वा आहे ,अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

२०२३ च्या अखेर दाखल गुन्ह्यांची मागील वर्षांशी तुलना केली तर त्यामध्ये ५४०० गुन्ह्यांची घट आहे असेही फडणवीस यावेळी म्हणाले.