CRICKET – पॉवेल, पूरनची झुंज ; भारताने विंडीजला 150 धावांच्या आतच गुंडाळले!

34

त्रिनिदाद : पहिल्या टी – 20 सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडीजला भारतीय गोलंदाजांनी 149 धावात रोखले. भारताकडून युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर कुलदीप यादवने 4 षटकात फक्त 20 धावा देत एक बळी टिपला. विंडीजकडून कर्णधार रोव्हमन पॉवेलने सर्वाधिक 48 धावा केल्या. तर निकोलस पूरनने 41 धावांचे योगदान दिले.

पॉवर प्लेनंतर पहिल्या 10 षटकात धावगती मंदावली होती. मात्र निकोलस पूरन आणि कर्णधार रोव्हमन पॉवेल यांनी डाव सारत संघाला शतकाजवळ पोहचवले. मात्र हार्दिक पांड्याने निकोलस पूरनला 41 धावांवर बाद करत ही जोडी फोडली.त्यानंतर रोव्हमन पॉवलेने 48 धावांची खेळी करत विंडीजला 150 धावांच्या जवळ पोहचवले.