२४, २५ जानेवारीला शिरगाव ओम गणेश मंदिराचा वर्धापन दिन सोहळा…!

देवगड : देवगड तालुक्यातील शिरगाव बाजारपेठ येथील ओम गणेश मंदिराचा वर्धापन दिन सोहळा व माघी गणेश जयंती उत्सव २४ व २५ जानेवारी रोजी पारंपारिक रितीरिवाजाप्रमाणे साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

२४ जानेवारी रोजी ओम गणेश मंदिराचा वर्धापन दिन सोहळा संपन्न होणार असून यानिमित्त सकाळी ८ वाजता “श्रीं” ची महापूजा व अभिषेक, सहस्त्र दुर्वा अर्पण, ९.३० वाजता स्तोत्र पठण, १०.३० वाजता आरती, तीर्थप्रसाद, ११ वाजता शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा ही स्पर्धा पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी व सातवी ते नववी अशा तीन गटात घेण्यात येणार असून प्रत्येक गटातील विजेत्या पहिल्या तीन क्रमांकांना रोख रक्कमेची आकर्षक बक्षीसे व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. दुपारी ३ वाजता स्थानिक सुस्वर भजने, रात्रौ ९ वाजता नाद संगीत विद्यालयाचा “नादसंध्या” हा कार्यक्रम होणार आहे.

२५ जानेवारी रोजी माघी गणेश जयंती उत्सव यानिमित्त सकाळी ९ वाजता स्तोत्र पठण, ९.३० वाजता महाआरती, ११ वाजता ह.भ.प. गुरुदास केळुसकर महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन, दुपारी १ वाजता महाप्रसाद, ३ वाजता स्थानिक सुस्वर भजने, सायंकाळी ५ वाजता हरिपाठ, ७.३० वाजता “श्रीं” ची महाआरती, रात्रौ ८ वाजता जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा, या स्पर्धा समूह नृत्य व सोलो नृत्य या दोन प्रकारात घेण्यात येणार असून यात समूह नृत्य प्रकारातील प्रथम तीन स्पर्धकांना ५००१/-, ३००१/- व २००१/- तर सोलो नृत्य प्रकारातील प्रथम तीन स्पर्धकांना २५००/-, १५००/- व १०००/- रुपये रोख व दोन्ही गटातील विजेत्या स्पर्धकांना चषक देऊन गौरविण्यात येणार आहे या दोन्ही कार्यक्रमांना गणेशभक्तांनी उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी असे आवाहन ओम गणेश मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.