सावंतवाडी तालुक्यातील कोतवाल पदाचे आरक्षण निश्चित!

116

सावंतवाडी : तहसीलदार सावंतवाडी यांचे आस्थापनेवरील कोतवाल संवर्गातील रिक्त असलेल्या पदांच्या 80 % मर्यादित पदभरती करणेकामी सजानिहाय सामाजिक प्रवर्ग व महिला समांतर आरक्षण गुरुवार ०३ ऑगस्ट २०१३ रोजी सायंकाळी ४.०० वाजता तहसीलदार कार्यालय सावंतवाडी येथे सोडत (लॉट) पद्धतीने आरक्षण निश्चित करण्यासाठी विशेष सभा आयोजित केलेली होती. सदर सोडतीच्या वेळी तालुकास्तरीय समितीतील अध्यक्ष व सर्व सदस्य तसेच संबंधित सजातील गावपातळीवरील मान्यवर उपस्थित होते. त्यांचे समक्ष सोडत पद्धतीने खालीलप्रमाणे आरक्षण निश्चित करण्यात आलेले आहे.
मळगाव करीता अ.जा. महिला,सांगलीकरिता सर्वसाधारण अ.ज.प्रवर्ग,चौगुळ करिता अ.ज. महिला,माडखोलकरिता भ.ज.ब.,तळवडे करीता भ. ज. क.,कुणकेरी भ. ज. ड.,चराठे करीता वि. मा. प्र.,सातार्डा,सावंतवाडी शहर, आणि तळवणे करीता इ. मा. व.,इन्सुलिकरिता इ.मा.व. महिला,डेगवे करीता ई डब्ल्यू एस महिला,निगुडे ई डब्ल्यू एस,असनीये अराखिव अशी समांतर तालुक्यातील कोतवाल पदासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे.