‘ज्ञानवापी’ प्रकरणात नवा ट्विस्ट! ‘मंदिर , मशीद नव्हे, हा बौद्ध मठ…’, सुप्रीम कोर्टात याचिका.

47

नवी दिल्लीः वाराणसीच्या ज्ञानवापी मशीद प्रकरणात अलहाबाद हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. कोर्टाने निर्णय देत मशीद परिसराचा ASI सर्व्हे करण्याची परवानगी दिलेली आहे.
२१ जुलै रोजी वाराणसी जिल्हा कोर्टाच्या न्यायाधीशांनी ज्ञानवापीच्या एएसआय सर्व्हेचे आदेश दिलेले होते. त्यानंतर मुस्लीम पक्षाने सुरुवातीला सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्यानंतर हायकोर्टामध्ये एएसआय सर्व्हे करण्याच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं. आता हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावलेली आहे. अलहाबाद कोर्टाने सांगितलं की, एएसआयचा सर्व्हे आवश्यक आहे. काही अटी लागू करुन या सर्व्हेची गरज आहे.

या प्रकरणाता आता एक मोठा ट्वीस्ट आलेला आहे. बौद्ध धर्मगुरुंनी सुप्रीम कोर्टात दावा केला आहे की, हा एक बौध मठ आहे. बौध पक्षाच्या वतीने सुप्रीम कोर्टामध्ये रिट याचिका दाखल करण्यात आलेली आहे. यात म्हटलंय की, ज्ञानवापी हे मंदिर अथवा मशीद नाही तर बौद्ध मठ आहे.