कणकवली विद्या मंदिर माध्यामिक प्रशालेत संगणक लॅबचे शानदार उद्घाटन!

212

कणकवली : संगणक प्रशिक्षण ही आज काळाची गरज आहे. ही महत्चाची गरज ओळखून संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय तवटे  यांनी प्रशालेला हिंदूस्थान पेट्रोलियम या संस्थेकडून आठ संगणक देणगी दिली. ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांची प्रगत शिक्षण प्रवाहात सक्षमपणे उभे रहावे, यासाठी विद्यामंदिर प्रशालेत स्वतः विकसित केलेला संगणक अभ्यासक्रम तयार करून प्रशालेतील इयत्ता पाचवी ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्याना नाविण्यपूर्ण संगणक कोर्स तयार करून प्रशिक्षण देण्याचा मानस केला. या कोर्ससाठी १५२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन संगणक अभ्यासाची सुरुवात केली. या कोर्सचे उद्‌गाटन संस्थेचे चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, विश्वस्थ श्री. डेगवेकर साहेब, मुख्याध्यापक  पी. जे . कांबळे, पर्यवेक्षिका सौ. जाधव, श्री.  वणवे सर व संगणक प्रशिक्षक शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचरी उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ. केळुसकर यांनी केले. आभार श्री. वणवे यांनी मांनले.