मुंबई : लगान, जोधा अकबर, हम दिल दे चुके सनम, यासारख्या कित्येक चित्रपटांना आपल्या कलादिग्दर्शनाचा साज चढवून प्रसिद्ध झालेल्या नितीन देसाई यांच्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. देसाई यांनी त्यांच्या एन डी स्टुडिओमध्ये आत्महत्या केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे.
देसाई यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र त्यांच्या जाण्यानं बॉलीवूडला मोठा धक्का बसला आहे. सध्या घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. गेल्या तीन दशकांपासून देसाई यांनी आपल्या कला दिग्दर्शनानं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. १९४२ पासून अ लव स्टोरी या चित्रपटानं त्यांच्या करिअऱची सुरुवात केली होती. कर्जत मध्ये देसाई यांचा स्टुडिओ होता. तो त्याच्या भव्यतेसाठी प्रसिद्ध होती. आता त्या स्टुडिओमध्ये त्यांनी आत्महत्या केल्यानं अनेकांना मोठा धक्का बसला आहे. केवळ हिंदीच नाहीतर मराठी आणि इतर भाषांमधील चित्रपटांचे कलादिग्दर्शन केले होते.





