CRIME – धक्कादायक! प्रेमप्रकरणातून तरूणीला बेदम मारहाण; दुसऱ्या तरूणाने शूट केला व्हिडीओ.

549

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर मध्ये एका तरूणाने तरूणीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमप्रकरणातून ही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
दरम्यान, सिल्लोड तालुक्यातील वसई बोदवड येथील ही घटना असल्याची माहिती आहे. तर हा आरोपी तरूण तरूणीला पोटात आणि गालावर बुक्क्यानी मारताना दिसत आहे. तरूणीचा एक हात पकडून लाथाही मारत असून तिथेच उभा असलेल्या एका तरूणाने हा व्हिडिओ शूट केला आहे. “मला मारू नको” असं ही तरूणी या तरूणाला बोलत असतानाही तरूण मारहाण करत आहे.
या व्हिडिओ संदर्भात अधिकृत माहिती अजून समोर आली नाही, पण प्रेमप्रकरणातून ही मारहाण झाली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. आपली मैत्री, मैत्रीतील धोका यामुळे हे भांडण झाले असल्याचं त्यांच्या बोलण्यावरून कळून येत आहे. तर ही घटना कधीची आहे यासंदर्भातील माहिती समोर आली नाही. पण हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.