बांदा : गोव्यातून सिंधुदुर्गात होणार्या बेकायदा दारु वाहतुकी विरोधात राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने कारवाई केली. यात ५ लाख ३२ हजार ८०० रुपयांच्या दारुसह एकूण ११ लाख ५७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारु वाहतूक प्रकरणी गणपत प्रभाकर माईंडकर (वय २८, रा. कोलगाव चाफेली) याला अटक करण्यात आली. जुन्या मुंबई – गोवा महामार्गावर आरोसबाग फाट्यावर ही कारवाई करण्यात आली.





