सावंतवाडी : तालुक्यातील माडखोल येथील व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाचा अंतीम वर्षाचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात महाविद्यालयातून नेहा तांबेटकर प्रथम, समीक्षा पवार व विनायक पडवे द्वितीय तर क्रांती गावकर व धनश्री परब या दोघांनी तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्कृष्ट निकालाची परंपरा राखल्याबद्दल महाविद्यालयाचे तसेच सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे माजी कुलगुरू डॉ. वेदप्रकाश पाटील व संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार डॉ. राहुल वेदप्रकाश पाटील यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी पंकज पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील शिंगाडे, तसेच महाविद्यालयाच्या परीक्षा विभागाचे प्रमुख प्रा. मनाली वैद्य यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.





