भिडेंची मिशी कापणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस, समता परिषदेच्या माजी जिल्हाध्यक्षांची घोषणा!

71

जालना: समता परिषदेचे माजी जालना जिल्हाध्यक्ष नवनाथ वाघमारे यांनी तर संभाजी भिडेंची मिशी कापणाऱ्याला बक्षीस जाहीर केलं आहे. संभाजी भिडे यांनी देशात अशांतता पसरवण्याचं काम सुरु केलं आहे. भिडे हे महापुरुषांबाबत दररोज वेगवेगळे वक्तव्य करत आहेत. त्यामुळे भिडेंची मिशी कापणाऱ्याला ओबीसी समाजाकडून वर्गणी करून एक लाखांचं बक्षिस देण्याची घोषणा नवनाथ वाघमारे यांनी केली आहे.