मुंबई : लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी) कडुन असिस्टंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (AAO) पदासाठी रेजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार licindia.in. या अधिकृत वेबसाईटवर रेजिस्टर करू शकतात. रेजिस्टर करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी आहे.
या पदासाठी रेजिस्टर करण्यासाठी एप्लीकेशन फी ७०० रुपये आहे. तर SC/ST वर्गातील उमेदवारांसाठी ८५ रुपये फी आकारण्यात येईल. ही भरती प्रक्रिया असिस्टंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (AAO) च्या ३०० रिक्त पदांसाठी केली जात आहे. या परीक्षेनंतर प्रीरिक्रुटमेंट मेडिकल एक्झाम घेतली जाईल.





