उद्या मालवणात होणार आनंदी उपक्रम ; शिल्पा खोतची अभिनव संकल्पना..!

76

मालवण : ‘सन मराठी’ टीव्ही चॅनेल व सामाजिक कार्यकर्त्या सौ. शिल्पा यतीन खोत यांच्या वतीने समर्थ हॉल कोळंब येथे उद्या रविवार दिनांक ३० जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता ‘आनंदी’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे महिलांच्या कलागुणांना मोठं व्यासपीठ मिळणार आहे.

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात घर व संसारात वाहून घेणाऱ्या सर्व माऊलींना अर्थात महिलांना विरंगुळा मिळावा, यासाठी महाराष्ट्राच्या मनोरंजन क्षेत्रात नव्याने सुरू झालेली सन मराठी’ वाहिनी (चॅनेल) विशेष उपक्रम घेऊन मालवणात दाखल होत आहे. अभिनेते आशिष पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजन सौ. शिल्पा यतीन खोत व सहकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.