बांदा येथे पंतप्रधान किसान समृद्धी सुविधा केंद्रातर्फे शेतकऱ्यांना खत वाटप!

67

बांदा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधून ‘पंतप्रधान किसान समृद्धी सुविधा केंद्रा’चा शुभारंभ केला.

पंतप्रधानांनी आजच्या कार्यक्रमात किसान समृद्धी सुविधा केंद्र देशभरात २ लाख ८ हजार ठिकाणी सुरु केली. त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, औषधे, खते, कीटकनाशके व अन्य अवजारे एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.

या कार्यक्रमांतर्गत आज बांदा येथे खत वाटप करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी खत वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या शुभारंभ वेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कामत, बांदा मंडळ सरचिटणीस मधुकर देसाई, प्रवीण देसाई किसान मोर्चा अध्यक्ष, विनेश गवस वाफोली उपसरपंच, कैलास गवस, ग्रामपंचायत सदस्य नेतर्डे, राजू देसाई ग्रामपंचायत सदस्य डेगवे, बाळा केरकर माजीउप सरपंच, बांदा कृषी केंद्र प्रमुख पुरुषोत्तम दळवी व शेतकरी उपस्थित होते.