सावंतवाडी : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ठाकरे शिवसेनेच्या वतीने आज येथील कळसुलकर प्रशालेत ८९ मुलांना पुस्तके वाटप करण्यात आली. केवळ सामाजिक बांधिलकी म्हणून हा उपक्रम राबवत आम्ही आहोत. यात राजकारण काही नाही. मुलांचे नुकसान होऊ नये यासाठी आम्ही पुस्तके देण्याचा निर्णय घेतला आहे, असे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मायकल डिसूझा, अनुप नाईक, शैलेश पई, भरती कासार, आबा सावंत, योगेश नाईक, प्रशांत बुगडे, राजू शेटकर, श्रुतिका दळवी, चंद्रकांत कासार, विशाल काजरेकर तसेच आदी पदाधिकारी उपस्थित होते.





