कोकणातील ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ, माजी खासदार ॲड. बापूसाहेब परुळेकर यांचे निधन

32

रत्नागिरी : कोकणातील ख्यातनाम वकील व माजी खासदार ॲड. बापूसाहेब परुळेकर यांचे आज सकाळी ८  वाजून ५० मिनिटांनी त्याच्या रहात्या घरी निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ९४ वर्षे होते.

रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणात व राज्यात एक बुद्धिवंत कायदेतज्ज्ञ म्हणून ते परिचित होते. जनता पार्टीचे खासदार म्हणून बापूसाहेब हे लोकसभेवर दोन वेळा निवडून गेले होते.

रत्नागिरी जिल्हा जनसंघाचे ते जिल्हा अध्यक्ष होते. 1960 ते 1970 रत्नागिरी जिल्हा संयुक्त महाराष्ट्र समितीचे ते 1957 ते 60 च्या काळात ते चेअरमन होते.
व्हाईस चेअरमन आणि प्रेसिडेंट म्हणून अनेक एज्युकेशन आणि सांस्कृतिक संस्थांचे शाळांचे त्यांनी काम पाहिलेले आहे.
प्रमोटर मेंबर म्हणून रत्नागिरी जिल्हा रोटरी क्लबचे ते मेंबर होते.

पोस्टल ॲडव्हायझर कम्युनिटी फॉर महाराष्ट्र स्टेटचे 1978 ते 1979 पर्यंत ते त्याचप्रमाणे रेल्वे युजर कम्युनिटी सेंट्रल झोनचे ते एग्रीकल्चर कौन्सिलर डेव्हलपमेंट सर्कल यासारख्या अनेक संस्थांवर सामाजिक सांस्कृतिक आणि राज्यस्तरीय कमिटी, समित्यांवर ते अध्यक्ष होते. ते कायद्यात एज्युकेशन ऍक्टिव्हिटी स्पोर्ट्स क्लब टेनिस अँड क्रिकेट यासारख्या अनेक कार्यरत होते.

त्यांच्या पश्यात मुलगे ऍड. बाबा परुळेकर, पंकज परुळेकर, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांची आज दुपारी 3 वाजता अंत्ययात्रा निघणार आहे.