सावंतवाडी : रत्नागिरी नाटे येथून बेळगाव येथे मासे विक्री करून आंबोली मार्गे पडत असताना आंबोली घाटमार्गात गाडी अडवून तसेच चाकूचा धाक दाखवून मत्स्यव्यवसायिकांना लुटण्याचा खळबळ जनक प्रकार उघडकीस आला आहे. घटमार्गात उभ्या असलेल्या दुचाकीस्वारांनी चाकूचा धाक दाखवून आपल्याकडील मोबाईल व रोख रक्कम काढून घेतली तसेच आपल्याला मारहाण केली अशी तक्रार संबंधित व्यवसायिकांनी सावंतवाडी पोलिसात दाखल केली आहे. त्यांची तक्रार नोंद करून घेण्याचे काम सुरू असून या खळबळजनक प्रकारामुळे आंबोली घाटाच्या सुरक्षिततेबाबत पून्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.





