Home ब्रेकिंग न्यूज आरोंदा परिसरात पावसाचा कहर ; घरावर झाड पडून नुकसान..!

आरोंदा परिसरात पावसाचा कहर ; घरावर झाड पडून नुकसान..!

327

सावंतवाडी : तालुक्यात काल काही प्रमाणात विश्रांती घेतलेल्या पावसाने आज मात्र पहाटेपासूनच पुन्हा एकदा जोरदार बॅटिंग केली आहे. पावसाच्या या कहरामुळे पडझडीच्या घटना सुरूच आहेत. बुधवारी पहाटे आरोंदा येथील कोशेसाॅव डाॅमनिक फर्नाडिस यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून नुकसान झाले.
फर्नांडिस हे कामानिमित्त मुंबईला असतात, मात्र या घरात काही भाडेकरू राहत होते. स्लॅबचे घर असल्यामुळे कोणालाही कोणत्याही प्रकारची शारीरिक इजा झाली नाही. मात्र घराच्या सज्जाचे व इतर भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानीचा पंचनामा करण्यात येणार असल्याची माहिती आरोंदा ग्रामसेवक सतीश राणे यांनी दिली.

दरम्यान, तालुक्यात अन्य भागातही काही प्रमाणात पडझड सुरूच आहे. सावंतवाडी जूनी पंचायत समितीच्या मागील भागात असलेली जांभ्या दगडाची संरक्षक भिंत कोसळली असून ती हटवण्याचं काम सुरू आहे. पुरामुळे वाफोली येथे बागायती चे नुकसान झाले आहे. शहरातील गांधी चौक येथे संजू पोकळे याच्या दुकानाच्या समोर मोठा खड्डा पडला आहे. त्या ठिकाणी मोरी आहे त्यामुळे रस्त्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.तूर्तास त्या ठिकाणी बॅरिकेट लावण्यात आले आहेत. मात्र रात्रीच्या अपघात होण्याची शक्यता नाकारता असल्याने नगरपालिका प्रशासनाने याबाबत त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.