वेंगुर्ले : भाजपा नेते माजी आमदार राजन तेली यांचा वाढदिवस सेवादिन म्हणून करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आज शहरातील श्री देव रामेश्वर मंदिर व श्री मारुती मंदिराकडील फुल विक्रेत्यांना मोठ्या छत्र्यांचे वाटप करण्यात आले. श्री. तेली यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज येथे भाजप पदाधिकाऱ्यांनी पूजा केली.
यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस बाळू देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, शरद चव्हाण श्री देव रामेश्वर देवस्थानचे मानकरी रवी परब, दाजी परब तसेच वसंत तांडेल, मनवेल फर्नांडिस, अॅड. सुषमा प्रभूखानोलकर, साईप्रसाद नाईक, प्रणव वायंगणकर, प्रकाश रेगे, राजेश कांबळी, संतोष सावंत प्रीतम सावंत पुंडलिक हळदणकर वृंदा गवंडळकर, वृंदा मोर्डेकर, शेखर काणेकर, रवी शिरसाट, शरद मेस्त्री, ओंकार चव्हाण आदींसह फुल विक्रेते किरण काटवी, नरेंद्र किनळेकर, चंद्रभागा कुबल, विमल मांजरेकर, गीता वेंगुर्लेकर व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.





