त्या’घटनेमुळे भारताची मान शरमेने खाली गेली! ; अर्चना घारे संतापल्या

368

सावंतवाडी : मणिपूर येथे महिलांच्या बाबतीत जो घाणेरडा प्रकार झाला, त्यामुळे जागतिक पातळीवर भारताची मान शरमेने खाली गेली आहे, मानवतेला काळीमा फासणारी ही बाब असून त्या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो, असा संताप करत मणिपूर घटनेचा निषेध कोकण विभागाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा अर्चना घारे परब यांनी सावंतवाडीत व्यक्त केला.

मणिपूर येथे घडलेल्या महिला हिंसाचाराच्या विरोधात आज येथील राष्ट्रवादीच्या माध्यमातून लाक्षणिक मौन आंदोलन करण्यात आले. यावेळी काळ्या फिती बांधून या घटनेचा निषेध करण्यात आला.
येथील गांधी चौक परिसरात कोकण महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी राज्यमंत्री प्रविण भोसले उपस्थित होते.

दरम्यान दोन महिन्यापूर्वी घडलेला हा प्रकार वेदनादायी आहे. याची कोणीही दखल घेत नाही, हे त्यांच्यापेक्षा वेदनादायी आहे, अशी खंत यावेळी सौ. घारे यांनी व्यक्त केली. यावेळी या घटनेकडे दुर्लक्ष करणाऱ्या राज्य व केंद्र शासनाच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी नेते प्रवीण भोसले बोलत होते. या घटनेचा पूर्ण देशभरात निषेध झालेला आहे. पण मोदी सरकार मात्र निश्चिंत आहे. या मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेमुळे पूर्ण जगामध्ये भारत देशाची बदनामी झाली आहे. या घटनेचा निषेध म्हणून राष्ट्रवादीच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात येत आहे. मोदी सरकार व राज्य सरकारने राजीनामा द्यावा, असे ते यावेळी म्हणाले.

यावेळी माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, महिला जिल्हाध्यक्ष अॅड. रेवती राणे, युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, सावंतवाडी शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, महिला शहाराध्यक्ष अॅड. सायली दुभाषी, अल्पसंख्याक सेल महिला अध्यक्षा अॅड. राबिया शेख – आगा, तालुका उपाध्यक्ष प्रशांत पांगम, चराठे ग्रामपंचायत सदस्य गौरी गावडे, बावतीस फर्नांडिस, सरचिटणीस समीर सातार्डेकर, सुधा सावंत, श्रीकांत कोरगावकर, तौसिफ आगा, मारिता फर्नांडिस, मयुरी राऊळ, श्रावणी कोरगावकर, शबीना बेग, अनीशा सानगर, अनीशा शहा, समशाद शेख, साहिरा आगा, शहाबाज आगा, संतोषी वर्देकर, नेहा पटेल आदी उपस्थित होते.