उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन : जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

161

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशात्सव मंडळांची निवड करण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमामध्ये सार्वजनिक गणेशात्सव मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.
इच्छुक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या इमेलवर दि. १० जुलै ते ५ सप्टेंबर पुर्वी ऑनलाईन अर्ज करावेत. पहिल्या ३ विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पुढीलप्रमाणे पारितोषिकं व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येईल.
प्रथम क्रमांक ५ लाख रुपये, व्दितीय क्रमांक – २ लाख ५० हजार रुपये, तृतीय क्रमांक- १ लाख रुपये अशा स्वरुपाची पारितोषिक प्रमाणपत्र देण्यात येईल. निकालाचा दिनांक, सर्व विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बक्षीस वितरणाचा समारंभ कोठे व कसा करायचा याबाबत स्वतंत्र सूचना देण्यात येतील. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा नियोजन समिती कार्यालय, सिंधुदुर्ग येथे संपर्क साधावा.