माणगाव खोऱ्यातील युवासेना आक्रमक,वीज कार्यालयावर दिली धडक!

33

कुडाळ :  माणगाव खोऱ्यातील गावांमध्ये गेले आठ दिवस वीजेचा लपंडाव सुरू आहे.अक्षरशः महावितरणचा लोकांच्या जीवाशी खेळ चालू आहे.भोंगळ कारभार चालू आहे.एक महिन्याचा वीज बिल माफ करावे किंवा एका महिन्याचे विजबिल कार्यकारी अभियंत्याने भरावे..

वीज कर्मचारी कमी,वीज कर्मचारी यांना सेफ्टी नाही असे अनेक विषय ग्रामस्थांच्या वतीने व्यथा मांडण्यात आल्या.परंतु वरीष्ठ अधिकारी एकही आले नाही येऊ नका पण १ महिन्याच वीजबिल माफ करा किंवा वीजबिल कार्यकारी अभियंत्यांनी भरावे असे कार्यकारी अभियंता यांना खडे बोल योगेश धुरी यांनी सुनावले आहे‌.