वेंगुर्ला येथील घटना
वेंगुर्ला : वेंगुर्ला शहरातील सेंटलुक्स हॉस्पीटलच्या विहीरीमध्ये एका युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. साईश सुरेश वेंगुर्लेकर (वय ३१) असे तरुणाचे नाव आहे. सदर प्रकार काल रात्री उशिरा उघड झाला. या युवकांने आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सेंट लुक्स हॉस्पीटलच्या कंपाउंडमध्ये साईश याचे घर आहे. घराच्या बाजूला असलेल्या विहिरीमध्ये मध्यरात्री त्याचा मृतदेह दिसून आला. साईश याचे मानसिक संतुलन बिघडलेले होते. याबाबत कमलाकर आपा वेंगुर्लेकर यांनी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास तपास पोलीस उपनिरीक्षक तुकाराम जाधव आणि पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत.





